Earthquake – दक्षिण पॅसिफिक बेटसमूहावर 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण पॅसिफिक बेटसमूहातील वानुआतूच्या किनाऱ्याजवळ 7.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची अद्याप नोंद झालेली नाही. स्थानिक प्रशासन खबरदारीचे उपाय योजत असून परिस्थतीवर लक्ष ठेवून आहे.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, हा भूकंप सोमवारी, 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7.44 वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 87.50 किलोमीटरवर होता. भूकंपाच्या वैज्ञानिक माहितीचे पुनरावलोकन केले जात आहे.

अहवालानुसार, भूकंपाच्या केंद्रापासून 28 किलोमीटर अंतरावर असलेले लुगानविल, 41 किलोमीटर अंतरावर असलेले हॉग हार्बर, 51 किलोमीटर अंतरावर असलेले पोर्ट-ओली, 75 किलोमीटर अंतरावर असलेले नॉरसप आणि 169 किलोमीटर अंतरावर असलेले सोला या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.