
तमिळनाडूमध्ये एका दलित व्यक्तीला ओबीसी जातीच्या व्यक्तीच्या जबरदस्तीने पाया पडायला लावले. नंतर त्याचा एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे.
तमिळनाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यात पौलराज आणि सिवसंगू हे दोघे आल्या मेंढी आणि शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन जात होते. तेव्हा काही पौलराज यांच्या काही शेळ्या सिवसंगू यांच्या शेळ्यांच्या कळपात घुसल्या. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. तेव्हा रस्त्यावर उपस्थित एका व्यक्तीने मध्यस्थी करत दोघांचा वाद मिटवला. नंतर सिवसंगूने आपल्या नातेवाईकांना आणि समाजातील लोकांना झालेली हकीगत सांगितली. पौलराज हा दलित व्यक्ती आहे, तर सिवसंगू हा थेवर जातीचा असून ते इतर मागास वर्गीयांमध्ये मोडतात. आपल्यावर खालच्या जातीच्या माणसाने हल्ला केला असे सिवसंगूने आपल्या नातेवाकांना सांगितले. सिवसंगूने माणसं जमवली आणि पौलराजला धरून आणले. पौलराजला जबरदस्तीने सिवसंगूच्या पाया पडायला लावले. सिवसंगूच्या माणसांनी त्याचा एक व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. नंतर पौलराजने पोलिसांत धाव घेतली आणि सिवसंगूच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून 7 जणांना अटक केली आहे.

























































