हिंदुस्थानच्या 7 बॉक्सर्संना कांस्यपदके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 15 वर्षांखालील आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत रविवारी (दि. 10) सात कांस्यपदकांची कमाई केली. याचबरोबर सहा खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली. यात हिंदुस्थानला किती सुवर्णपदके मिळतील ते बघावे लागले. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे रविवारी झालेल्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानी खेळाडूंनी आपली ताकद दाखवून दिली.

33 किलो गटात यश कुमारने यूएईच्या कियान इक्बालवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. 37 किलो गटात सस्था वसंत अशोक कुमारने किर्गिझस्तानच्या अझिरेटाली सान्झारबेकोव्हविरुद्ध दुसऱ्या फेरीत रेफ्री स्टॉप कॉन्टेस्ट (आरएससी) द्वारे विजय मिळवला. 43 किलो गटात समीर बोहराने संयमी खेळ करत उझबेकिस्तानच्या आदिजबेक इल्खोम्बेकोव्हला 4-1 अशा फरकाने पराभूत केले. 52 किलो गटात सुदर्शन वासुदेव चांडकने इराणच्या अमीरमहदी शादविरुद्ध पहिल्याच फेरीत आरएससी विजय नोंदवत आपले वर्चस्व सिद्ध केले. 58 किलो गटात मोहम्मद यासरने इराणच्या सय्यद अरियामोहम्मद मौसावर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. 67 किलो गटात रोनक पराग लोखंडेने किर्गिझस्तानच्या मुखम्मदअली बर्दिकुलोव्हला पहिल्याच फेरीत आरएससी हरवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.