आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर बसला भीषण अपघात, 7 प्रवासी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर भरधाव खासगी बस ट्रकवर जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले असून, 34 जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या खासगी  बसने रविवार पहाटे उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील करहल येथे ट्रकला जोरदार धडक दिली. दरम्यान, झोपेमुळे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.