घरासमोरील कठड्यावर बसू दिले नाही म्हणून तरुणावर तलवारीने हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

परळी शहरातील मिलिंद नगर भागात शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. आझाद नगर येथील रहिवाशी असलेल्या शेख शादुल, शेख गौस, शेख रशीद, शेख माहेबूब, शेख दाऊद व इतर दोघांनी मिळून त्या तरुणाला तलवारीने मारहाण केली.

फारुख खान पठाण असं जखमीचं नाव आहे. नाकावर दुखपात झाल्याने जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याने आरोपींना त्याच्या घरासमोरील कठड्यावर बसू नका असे सांगितले होते. त्याचा राग मनात धरून फारुखवर तलवारीने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत सांगितलं गेलं आहे. या प्रकरणात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध सुरु घेत असल्याची तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.