
नगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत 70 ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 1327 इतकी झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2858 इतकी झाली आहे. तसेच शनिवारी 44 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने ते घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1480 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर तालुका 12, पारनेर तालुका 5, नेवासा तालुका 2, राहाता 11, राहुरी 7, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 3, नगर शहर 11, पाथर्डी 1, शेवगाव 1, भिंगार 10, कर्जत 2, अकोले तालुका 1, नांदेड 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 1327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1480 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 2858 कोरोनाबाधित आहेत.


























































