जालन्यात 69 रुग्णांचे निगेटिव्ह, 73 रुग्णांना डिस्जार्च

800

जालना जिल्ह्यामध्ये 28 मार्च रोजी 2 रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत, आतापर्यंत एकूण 109 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी 76 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 69 रुग्णांचे अहवाल प्राप्त  झाले असून ते निगेटिव्ह आले व त्या 76 रुग्णांपैकी 73 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रोजी 4 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणार्‍या सर्व व्यक्तींचे घरी विलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 109 परदेश प्रवास केलेले व्यक्तींपैकी 107 व्यक्तींचे घरीच विलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातुन आलेल्या 749 व्यक्तींचे तपासणीअंती घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये एकुण 15 संस्था विलगीकरणासाठी निवडल्या असून त्यामध्ये 1539 खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या