‘ब्रम्हास्त्र’ची पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या ‘ब्रम्हास्त्र्ा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला 75 कोटी रुपयांची ओपनिंग मिळाल्याची माहिती दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी सोशल मीडियावर दिली आहे. कोरोना कालावधीनंतर सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा हा बॉलीवूडचा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट रणबीर कपूरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘ओपनिंग ड’s कलेक्शन ठरला आहे. याआधी त्याच्या ‘संजू’ या चित्रपटाने 35 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात रणबीर-आलियाशिवाय नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदुस्थानात सुमारे 5 हजार स्क्रीनसह जागतिक स्तरावर 8913 स्क्रीन्समध्ये रिलीज झाला आहे.