हिंदुस्थान आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून ते देशाला संबोधित करत आहेत.
- देशाच्या 75 वर्षाच्या प्रवासात नारी शक्तीचे मोठे योगदान
- आत्मनिर्भर हिंदुस्थान हा सरकारी अजेंडा नव्हे तर जनआंदोलन
- 75 वर्षात पहिल्यांदाच स्वदेशी तोफांची राष्ट्रध्वजाला सलामी
- स्त्रीचा अपमान करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून मुक्तीचा संकल्प
- हिंदुस्थानला जगात सर्वश्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न
- जमिनीशी नाळ जुळेल, तेव्हाच आपण झेप घेऊ
- कुटुंबव्यवस्था ही हिंदुस्थानची ताकद
- आपल्या परंपरांचा आपण अभिमान बाळगायला हवा
- आम्हाला हिंदुस्थानच्या सामर्थ्यावर विश्वास
- आत्मनिर्भर हिंदुस्थान हाच देशाचा मंत्र
- नवे शैक्षणिक धोरण गुलामीतून मुक्ती देईल
- जगाला हिंदुस्थानकडून मोठ्या अपेक्षा
- स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला पंतप्रधान
- नागरिकांचे कर्तव्य हा पाचवा संकल्प
- एकता आणि एकजुटीचा चौथा संकल्प
- हिंदुस्थानच्या समृद्ध वारशाचा गौरव करणे शिकणे तिसरा संकल्प
- गुलामीचा अंश मिटवणे हा दुसरा संकल्प
- 2047 पर्यंत विकसीत हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करणे हा पहिला संकल्प
- पूर्ण ताकदीने देशाची आगेकूच सुरू
- देशातली सामूहिक चेतना हिच देशाची ऊर्जा
- देश लसीकरणाबाबत संभ्रमात असताना हिंदुस्थानने कोरोना लसीकरणाचा विक्रम केला आणि 200 कोटी डोस नागरिकांना दिले, हेच हिंदुस्थानचे सामर्थ्य आहे
- तळागाळातील जनता समृद्ध व्हावी हेच महात्मा गांधींचे स्वप्न, हे स्वप्न केंद्र आणि राज्य सरकारला पूर्ण करायचंय
- आदिवासी बांधवांनी मातृभूमिसाठी लढा लढण्याची प्रेरणा दिली
- विविधता हिच हिंदुस्थानची अनमोल शक्ती
- हिंदुस्थान लोकशाहीचा जनक आहे
India is the mother of democracy. India has proved that it has a precious ability, and faced many challenges during its journey of 75 years: PM Modi at Red Fort#IndiaAt75 pic.twitter.com/qBxb43XDYs
— ANI (@ANI) August 15, 2022
- 75 वर्ष देश अनेक संकटातून उभा राहिला
- वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण करण्याचा दिवस
- 75 वर्षात देशाची सेवा करणाऱ्यांच्या गौरव करण्याचा दिवस
- स्वातंत्र्यात क्रातिविरांचे मोठे योगदान
- स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले
- आजचा दिवस ऐतिहासिक, देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जल्लोष
- गेले तीन दिवस देश तिरंगामय झालाय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
- तिरंग्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
#WATCH PM Narendra Modi hoists the National Flag at Red Fort on the 76th Independence Day pic.twitter.com/VmOUDyf7Ho
— ANI (@ANI) August 15, 2022
























































