राज्यातील 7675 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralay

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱया सुमारे 7675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे राज्यातील या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.

राज्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱया सुमारे 7649 तसेच नवनिर्मित 8 तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे दोन-तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे सुमारे 7675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याकरिता आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळे माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱया ग्रामपंचायतींच्या मुदती जशा संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.