
स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने शुक्रवारी रात्री शहरात मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत पोलिसांनी 79 ‘पाहिजे’ असलेल्या आरोपींना अटक केली. पोलिसांनी 230 ठिकाणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱया 10 तळीराम चालकांना अटक केली.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही अनुचित घटना घडू नये म्हणून शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी आणि पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी 524 मर्मस्थळे आणि संवेदनशील ठिकाणी जाऊन पाहणी केली तसेच शहरात ठिकठिकाणी होणाऱया ध्वजारोहणाच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. ऑपरेशन ऑल आऊटमध्ये पोलिसांनी 79 फरार आरोपींना अटक केली, तर 121 जणांवर एमपीडीएनुसार कारवाई केली.
































































