
बिहारमध्ये मतदार याद्यांच्या फेरतपासणी मोहिमेअंतर्गत मतदार बनण्यासाठी 8 लाख 51 हजार 788 लोकांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले असून फॉर्म-6 भरला आहे, तर एकूण 37 हजार 50 जणांना मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय जनता दलाच्या बूथ स्तरीय पदाधिकाऱयांनी तीन दावे केले असून भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (एमएल) ने एकूण 79 आक्षेप दाव्यांच्या माध्यमातून नोंदवले आहेत. आतापर्यंत राजकीय पक्षांनी एकूण 82 दावे दाखल केले आहेत. मतदार याद्यांच्या फेरतपासणी मोहिमेला त्यांचा कडाडून विरोध आहे.