सुकमामध्ये 9 नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रायपूर

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. मात्र या चकमकीत दोन जवान देखील शहीद झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या हितीनुसार, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमा भागात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीमा सुरक्षा दल आणि विशेष कृती दलाचे संयुक्त पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम भागात या पथकाची आणि नक्षलवाद्यासोबत चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात 9 नक्षलवादी ठार करण्यात जवानांना यश आले. तर, दोन जवान शहीद झाले.

दरम्यान, या ऑपरेशनला ‘प्रहर चार’ असे नाव देण्यात आले असून घटनास्थळी अतिरिक्त फौज पाठवण्यात आली आहे.