Video – 8 वर्षांच्या मुलीच्या घशात अडकलं च्युइंगम, तरुणांनी वाचवला जीव

केरळच्या कन्नूरमध्ये सायकल खेळताना 8 वर्षांच्या मुलीच्या घशामध्ये च्युइंगम अडकले होते. ही बाब लक्षात येताच जवळ उभ्या असलेल्या तरुणांनी मदत करत तिचा जीव वाचवला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय की, 8 वर्षांची चिमुकली सायकल खेळताना च्युइंगम खात आहे. काही वेळातच तिला अस्वस्थ वाटू लागते आणि ती सायकल चालवत तरुणांजवळ येते. मुलीच्या घशात च्युइंगम अडकल्याचे तिचा श्वास कोंडल्याचे कळताच उपस्थित तरुणांपैकी एक तिला प्राथमिक उपचार देतो आणि च्युइंगम बाहेर काढतो.