
काळबादेवी येथील ‘झालान भवन’ या 80 वर्षांच्या इमारतीची दुरुस्ती सुरू असताना बिल्डिंगचा एक मोठा भाग कोसळून दुर्घटना घडली. यावेळी रहिवासी राहत असलेला दुसरा भाग तातडीने रिकामा करण्यात आला. काही वेळातच इमारतीचा दुसरा भागही कोसळला. त्यामुळे या ठिकाणी राहणारे 60 ते 70 रहिवासी सुदैवाने बचावले.
कुर्ला येथे नाईकनगर सोसायटी सोमकारी रात्री इमारत कोसळून 19 जणांचा बळी गेला तर 14 जण जखमी झाले. या दुर्घटनेला काही तास उलटले असतानाच काळबादेकी, बदामकाडी येथील ‘म्हाडा’ची ’झालान भकन’ ही दुरुस्ती सुरू असलेली इमारत कोसळली. या इमारतीत 12 फ्लॅट क्याकसायिक कामांसाठी कापरले जात होते तर 4 फ्लॅट रहिवासी वापरत होते. या इमारतीत काही सुवर्ण कारागीरही काम करीत होते. मात्र ही इमारत धोकादायक स्थितीत आल्याने ‘म्हाडा’कडून गेल्या दीड वर्षापासून इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जकानांनी तत्काळ 5 फायर इंजिन, 1 रेस्क्यू व्हॅन, 4 रुग्णवाहिका यांसह घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. पालिका प्रभाग कार्यालयाकडून घटनास्थळी 13 कामगार क 1 जेसीबी उपलब्ध करण्यात आले.
…केवळ दैव बलवत्तर म्हणून
‘झालान भवन’च्या दुरुस्तीच्या कामासाठी इमारतीचा पुढील भाग खाली करण्यात आला होता. तर मागील भागात काही व्यावसायिक गाळे असल्याने क काही लोक राहत होते.
दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास इमारतीचा पुढील काही भाग अचानकपणे कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे इमारतीत व परिसरात घबराट पसरली. तातडीने इमारत रिकामी करण्यात आली.
अवघ्या अर्ध्या तासात म्हणजे दुपारी 2 वाजताच्या सुमारास इमारतीचा पश्चिमेकडील मोठा भाग पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून रहिवासी वाचले.
शिवाय याचकेळी इमारतीच्या खालील भागात व परिसरात अनेकजण उभे होते. त्यांनीही वेळीच तेथून काढता पाय घेतल्याने हे रहिवासीदेखील थोडक्यात बचावले.





























































