गोव्यात आढळले कोरोनाचे 9 रुग्ण, एकूण आकडा 22 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज गोव्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे.

गोव्यात 13 मे रोजी 7,14 मे रोजी 1,16 मे रोजी 5 आणि आज 17 मे रोजी 9 जण पॉझिटीव्ह सापडल्याने नव्या कोरोना रुग्णांची संख्या 22 झाली आहे. आता पर्यंत 7 जण पॉझिटीव्ह आढळल्या नंतर उपचार घेऊन बरे झाले आहेत.