साडेचार हजार विद्यार्थी लटकलेलेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

गुरुवारी जाहीर झालेल्या बायफोकलच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ५ हजार ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ९ हजार ५०६ विद्यार्थी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. बायफोकल शाखेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज केलेले तब्बल ४ हजार ४४९ विद्यार्थी अद्याप लटकलेलेच असून त्यांना कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला नाही.

बायफोकल प्रवेशाची दुसरी अंतिम यादी आज सकाळी ११ वाजता जाहीर झाली. दुसऱया यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २९ व ३० जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करून संगणीकृत पावती घ्यायची आहे.

एकूण १ हजार १९४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे.

९६५ विद्यार्थ्यांना दुसऱया पसंतीचे तर ७०३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या, ५१६ चौथ्या आणि ४४७ विद्यार्थ्यांना चौथ्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. n ६ ते ३० व्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळालेले सर्वाधिक १ हजार २३२ विद्यार्थी आहेत.

रूईया ९५ टक्के पार

बायफोकल शाखेची दुसरी यादी ९५ पार आहे. रूईया कॉलेजमधील ईलेक्ट्रॉनिक्स शाखेची कटऑफ ९७.२० टक्के आहे. तर कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या विनाअनुदानित जागांची कटऑफ ९४.८० टक्के आहे. मिठीबाई कॉलेजच्या कॉम्प्युटर सायन्सची कटऑफही ९२.६० टक्के आहे. तर ईलेक्ट्रॉनिक्ससाठी ८९.२० टक्के कटऑफ आहे. केसी आणि जयहिंद कॉलेजची कॉम्प्युटर सायन्सची कटऑफ अनुक्रमे ९०.४० आणि ९१.८३ इतकी आहे.

दुसऱ्या यादीत झालेले प्रवेश

शाखा      आलेले अर्ज   प्रवेश मिळाले
आर्ट्स      २                २
सायन्स     ९२२०          ४८९९
कॉमर्स      २८४           १५६
एकूण       ९५०६         ५०५७