९ वर्षाच्या चिमुकल्याची अपहरणानंतर दगडाने ठेचून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ९ वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करून त्याची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. शिवम दिग्विजय रजक असं हत्या झालेल्या मूलाचे नाव असून, या हत्येमुळं परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

बुधवारी रात्री शिवम घरातील सामान आणण्यासाठी दुकानात गेला ते परत आलाच नाही. बराच उशीर झाला तरी शिवम परत येत नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांनी पोलीसठाण्यात शिवम हरवल्याची तक्रार दाखल केली.

गुरुवारी सकाळी बुवापाडा खदान डोंगर भागात शिवमचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. शिवमला दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान शिवमच्या शेजारी राहणारा अर्जुन नावाचा इसम बुधवार रात्री दारू पिऊन शिवमच्या घरी आला असता शिवमने त्याला घरा बाहेर काढल्याने त्याचा राग धरून त्यानेच शिवमला ठार केले असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. त्यामुळे अंबरनाथ पोलिसांनी संशयित आरोपी अर्जुन याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.