
सामना प्रतिनिधी । नगर
कांद्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आसून या अनुदानासाठी नगर जिल्ह्यातुन 91 हजार अर्ज आले आहेत. कांद्याचे भाव घसल्याने राज्यशासनाने जाहीर केलेल्या अनुदान योजनेसाठी दुसर्या टप्प्यातील अडीच महिन्यात जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 591 शेतकर्यांनी 91 हजार 361 अर्ज दाखल केले आहेत. दुष्काळामुळे हैरान झालेल्या शेतकर्यांना आता अनुदानाची प्रतिक्षा लागली आहे.
राज्या सरकारने सुरवातीला 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत कांद्याची विक्री करणार्या शेतकर्यांना प्रतिक्विटंल 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार या कालावधीत जिल्ह्यातील 14 बजार समित्या व पाडळी येथील कृषी मार्केट अशा 15 ठिकाणी कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले होते.
पहिल्या टप्प्यातील अनुदानातही या शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले होते. नंतर कांद्याचे भाव नसल्यामुळे सदर अनुदानाची मुदत 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर वाढवण्यात आली असून अर्ज जमा करण्यासाठी 15 पेब्रुवारी मुदत देण्यात आली हेाती. नंतर ही मुदत 28 पेब्रुवारी 2019 पर्यंत करुन अर्ज जमा करण्याची मुदत नंतर पुन्हा 15 एप्रिल पर्यंत वाढवली होती.
नगर तालुका बाजार समितीत सर्वाधिक जास्त 59 हजार 742 शेतकर्यांनी 26 हजार 772 अर्ज दाखल केले आहेत. तर अकोले बाजार समितीत सर्वाधिक कमी 448 शेतकर्यानीं 128 अर्ज दाखल केले आहे. या अडीच महिन्याच्या कालावधीत सदर ठिकाणी 42 लाख 2 हजार 869 क्विंटल कांद्याची विक्री झाली आहे. आता अनुदान केव्हा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






























































