
पालिका कर्मचार्यांच्या पाठोपाठ बेस्ट कर्मचार्यांचीही दिवाळी यंदा गोड होणार आहे. बेस्ट प्रशासनाने बेस्ट कर्मचार्यांना 9,100 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावच बेस्ट समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
बेस्टला प्रचंड आर्थिक तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतर बेस्टचे अच्छे दिन येण्यास सुरूवात झाली आहे. रेल्वे, म्हाडा, मुंबई महापालिकेपाठोपाठ बेस्ट प्रशासनानेही विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिवाळी बोनसचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या वर्षी बेस्टने कामगारांना 5,500 रुपये बोनस मिळाला होता.




























































