
अकोला जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात कोरोना तपासणीचे 100 अहवाल मिळाले. त्यातील 93 अहवाल निगेटिव्ह तर सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 82 झाली असून प्रत्यक्षात 57 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान गेले महिनाभर उपचार घेणाऱ्या तीन वर्षांच्या बालकाल बुधवारी पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी एकूण 1120 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 1039 अहवाल आले आहेत. आतापर्यंत एकूण 957 अहवाल निगेटिव्ह तर 82 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 81 अहवाल प्रलंबित आहेत.
आतापर्यंत एकूण 1120 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 923, फेरतपासणीचे 96 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 101 नमुने होते. आतापर्यंत एकूण 1039 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 845 तर फेरतपासणीचे 96 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 101 अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 957 आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल 82 आहेत. तर आज अखेर 81 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. बुधवारी मिळालेल्या 100 अहवालात 93 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बुधवारी सायंकाळी महिनाभर उपचार घेऊन पूर्ण बरे झालेल्या एका तीन वर्षांच्या बालकाला घरी सोडण्यात आले. हा बालक 7 एप्रिल रोजी दाखल झाला होता. हा बैदपुरा येथील रहिवासी आहे. तब्बल महिनाभराच्या उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. आता या बालकाला 14 दिवस गृह अलगीकरणात रहावे लागणार आहे. आता सद्यस्थितीत 82 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 14 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत 57 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
























































