मुंबईत 93 टक्के महिला भावनिक हिंसाचाराच्या बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांना नोकरी, घरकाम करताना अनेकदा आपल्या इच्छेविरुद्ध काम करावे लागते. मुंबईतील 93 टक्के महिलांना भावनिक, हिंसाचार सहन करावा लागला आहे, असा दावा सोसायटी फॉर न्यूट्रिशन एज्युकेशन अॅण्ड हेल्थ अॅक्शन (स्नेहा) ने केला आहे. स्नेहा संस्थेने यासंबंधी एक सर्वेक्षण केले असून यात हा दावा केला आहे. कुटुंबात राहत असताना महिलांचा आर्थिक स्वरूपाचा छळ 84 टक्के, शारीरिक हिंसाचार 80 टक्के, जबरदस्तीने नियंत्रण ठेवणे व दुर्लक्ष करणे असे दोन्हींचे प्रमाण हे 78 टक्के होते. कुटुंबातील सदस्यांकडून हिंसा सहन करणाऱ्या महिलांचे प्रमाण 48 टक्के होते, तर कुटुंबातील फक्त एका सदस्याकडून हिंसा सहन करणाऱया महिलांचे प्रमाण हे 26 टक्के होते, असे या अहवालात म्हटले आहे. मुंबईतील 4 हजारांहून अधिक महिलांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या हिंसाचारासंबंधी माहिती गोळा करण्यात आली, असेही स्नेहा संस्थेने म्हटले आहे. मुंबईतील 24 वस्त्यांमध्ये सामुदायिक हस्तक्षेपाचा प्रयोग यावेळी राबविण्यात आला. मुंबईत चार वर्षांच्या कार्यक्रमातून हाती आलेले निष्कर्ष जाहीर करण्यात आले. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराला रोखण्यासाङ्गी स्नेहा सामाजिक संस्थेने 72 महिला गट, 25 पुरुष गट आणि 24 युवा गट स्थापन केले होते.