परळीत 93 वर्षांच्या दगडगुंडे आजींनी बजावला मतदानाचा हक्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी राज्यभरात मतदान झाले. परळीत वयाच्या 93 व्या वर्षी एका आजींनी मतदान केले आहे. शहरात कालपासून सुरू असलेला पाऊस मतदानाच्या दिवशीही सुरूच होता. विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह परळी शहरातही दिसून आला. सकाळी 10 नंतर मतदारांनी उत्स्फूर्ततेने मतदान केले. जुन्या गाव भागात राहणाऱ्या गणेशपार येथील सुलोचना भगवानराव दगडगुंडे या 93 वर्षांच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यावर शाई लावलेले बोट दाखवत आजींनी ‘मी मतदान केले,तुम्हीही करा’ असा संदेशही मतदारांना दिला.