
संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात 96 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले असून त्यापैकी 56 जणांना क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. तर 46 जणांचे लाळेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेतून सोमवारी मिळालेले 44 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर रविवारी जिल्हा रुग्णालय आणि घाटी येथे प्रत्येकी एक असे एकूण दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 5 आणि सोमवारी 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या कोविड रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रयोगशाळेत पाठवलेल्या अहवालापैकी दोनजणांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशिवाय 39 रुग्ण संशयित असून त्यांनी 14 दिवसांचा उपचारांचा कोर्स पूर्ण केला आहे. तसेच आजवर एकूण 117 रुग्णांचा पाठपुरावा करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातून 12 आणि धूत रुग्णालयातून 2 असे एकूण 14 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.



























































