
अमेरिकेत अवैधरीत्या घुसखोरी करीत असताना 97 हजार हिंदुस्थानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी एका वर्षातील म्हणजेच ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023पर्यंतची आहे. हिंदुस्थानात धार्मिक छळ आणि बेरोजगारी वाढल्याने हे लोक अमेरिकेत घुसखोरी करीत आहेत, असे अमेरिकी मीडिया ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे.
‘यूएस कस्टम्स एन्ड बॉर्डर प्रोटेक्शन डेटा’च्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 96,917 हिंदुस्थानींपैकी 30,010 हिंदुस्थानी हे यूएस-पॅनडा सीमेवर पकडले गेले आहेत, तर 41,770 हिंदुस्थानी हे यूएस-मेक्सिको सीमा ओलांडताना पकडले गेले आहेत. अमेरिकेचे खासदार जेम्स लँकपर्ह्ड यांनी संसदेत म्हटले की, गेल्या वर्षभरात जवळपास 45 हजार हिंदुस्थानींनी अवैधरीत्या अमेरिकेतील दक्षिण सीमा ओलांडली आहे. या लोकांना आपल्या देशात राहण्यास भीती वाटत आहे. त्यामुळेच ते अमेरिकेत घुसखोरी करीत आहेत. अमेरिकेत अवैधरीत्या घुसखोरी करण्यात हिंदुस्थानी जगात तिसऱ्या नंबरवर आहेत, असे थिंक टँक न्यू अमेरिकन इकॉनॉमीने म्हटले आहे.
गेल्या वर्षी जानेवारीत अमेरिकेपासून 30 मैल दूर अंतरावर कॅनडात एका गुजराती कुटुंबातील चार जण बर्फात दबलेले आढळले होते. हे कुटुंब अवैधरीत्या अमेरिकेत जात होते. घुसखोरी करणारे 20 हजारांहून जास्त हिंदुस्थानी जेलमध्ये बंद आहेत.

























































