
आज 24 एप्रिल… क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये झाला. सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड रचले, मोडले, त्यांची उंची आणखी वाढवली. 2013 साली क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिनचा उल्लेख आजही प्रत्येक सामन्यावेळी केला जातो. अद्यापही सचिनचे अनेक रेकॉर्ड आबाधित आहेत.
आपल्या क्रिकेट करिअरमध्ये सचिनने 200 कसोटी साामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 15,921 धावा काढल्या आहेत. 51 शतके आणि 68 अर्धशतके त्याने झळकावली आहेत. तर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 49 शतके आणि 96 अर्धशतकांसह एकूण 18426 धावा काढल्या आहेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावापुढे 34,357 धावांची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकवण्याचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे.
एका वर्षात सर्वात जास्त धावा काढणारा खेळाडू

1998 हे वर्ष क्रिकेटमध्ये ‘सचिन वर्ष’ म्हणून ओळखले जाते. त्यावर्षी सचिन जबरदस्त फॉर्मात होता. 1998 साली खेळलेल्या एकदिवसीय लढतीमध्ये सचिनने 1,894 धावा केल्या आहेत.
कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा पन्नाशी पार…

सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या. कसोटी 119 वेळा त्याने पन्नाशी पार केली. या यादीत सचिनच्या जवळपासही कोणता खेळाडू नसून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या अॅलिस्टर कूकने कसोटीत 87 वेळा पन्नाशीचा आकडा गाठला आहे.
एकदिवसीय सामन्यांचा राजा

कसोटीप्रमाणेच एकदिवसीय सामन्यातही सचिनची बॅट तळपली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यात सचिनने 145 वेळा पन्नाशी ओलांडली आहे.
सर्वात जास्त अर्धशतकं

सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 96 अर्धशतकं झळकावली आहेत.
सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ दि मॅच’

सचिनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 463 सामन्यांमध्ये 62 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला आहे.
सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ दि सिरीज’चा किताब

सचिनने एकूण 15 वेळा ‘मॅन ऑफ दि सिरीज’चा किताब पटकावला आहे
सर्वाधिक वेळेस 90 धावांचा रेकॉर्ड

सचिनने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक 18 वेळा 90 ते 100 दरम्यान धावा केल्या आहेत.
एका वर्षात सर्वात जास्त एकदिवसीय शतक

1997 या एकाच वर्षात सचिनने 9 शतके ठोकली होती.
विश्वचषकमध्ये सर्वात जास्त धावा

विश्वकप क्रिकेटमध्ये सचिनच्या बॅटला वेगळेच स्फुरण चढते. सचिनने 6 विश्वचषकात एकूण 2,277 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये 6 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. विश्वकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे.


























































