एमपीएससीत पुण्याचा रोहितकुमार पहिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. २०१७ मध्ये झालेल्या या स्पर्धा परीक्षेत पुण्यातील विमाननगर येथील रोहितकुमार राजपूत याने प्रथम, सुधीर पाटील याने द्वितीय, सोपान टोंपे याने तृतीय, अजयकुमार नष्टे चौथा तर दत्तू शेवाळे याने पाचवा क्रमांक या परीक्षेत मिळवून बाजी मारली आहे.

उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सेल्स टॅक्स आणि इतर विभागांतील पदांसाठी एमपीएससी ही स्पर्धा परीक्षा २०१७ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत महिलांमधून रोहिणी नऱहे यांनी राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. या परीक्षेमधून ४८३९ उमेदवार पात्र ठरले होते. लेखी परीक्षेच्या आधारे ११९४ उमेदवार पात्र ठरले होते.