वेटलिफ्टर संजिता चानू डोपिंगमध्ये अडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी संजिता चानू ही डोपिंगमध्ये अडकली आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय वेटफ्टिंग फेडरेशनकडून गुरुवारी देण्यात आली. त्यामुळे आता तिला सुवर्ण पदकालाही मुकावे लागण्याची शक्यता आहे. तसेच तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

संजिता चानू हिने ५३ किलो वजनी गटात १९२ किलो वजन उचलून हिंदुस्थानला गोल्ड मेडल जिंकून दिले होते. मात्र संजिता चानू उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत फेल ठरली आहे. भविष्यात तिला चार वर्षांच्या बंदीच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून सॅम्पल केव्हा घेण्यात आले याबाबत सांगण्यात आलेले नाही.