अमेरिकेत रोहितला मिळणार खास सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला आणखी एक सन्मान प्राप्त होणार आहे. रोहितला अमेरिकेत बेस बॉल मॅचमध्ये ‘फर्स्ट पिच’ (उद्घाटनाची पारंपरिक पद्धत) करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. रविवारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. सिएटल मॅरीनर्सच्या स्टेडियममध्ये पिच करुन लीगला सुरुवात होणार आहे.

एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते या लीगची सुरुवात करण्याची परंपरा आहे. त्यामुळेच या लीगच्या आयोजकांनी उद्घाटनाला हिंदुस्थानच्या स्फोटक फलंदाज रोहित शर्माला आमंत्रित केलं आहे. रोहित पहिला हिंदुस्थानी क्रिकेटपटू आहे ज्याला अमेरिकन स्पोर्ट्स लीगमध्ये अशी मानाची संधी मिळाला आहे. या लीग मॅचमध्ये सिएटल मॅरीनर्स आणि टॅम्पा बे रेज हे दोन संघ भिडणार आहेत. रोहित सध्या पत्नी रितिका सोबत अमेरिकेत सुट्ट्यांची मज्जा घेत आहे. दरम्यान रोहित क्रिकेटसंबधीच्या अनेक कार्यक्रमातही सहभागी होणार आहे.