मशिदीत जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे ठार केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना प्रतिनिधी । मुंबई 

ऐन रमझानचा महिना सुरू असताना मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे तीन भावांनी अहमदाबाद हुसेन (२९) याच्यावर चाकूने वार करून ठार केले. देवनारच्या गौतमनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी ताहीर खान याला अटक केली असून त्याचे दोन भाऊ फरारी आहेत.

अहमदाबाद हुसेन हा भाऊ अख्तर आणि कुटुंबासह गौतमनगर १ मध्ये राहत होता. तो राहत असलेल्या गल्लीतून मशिदीमध्ये जाण्याचा मार्ग होता. येथूनच अनेकजण मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी येत-जात असत. शुक्रवारी अहमदाबाद आणि अख्तर यांनी येथून मशिदीत जाण्यास मनाई केली. यावरून ताहीर खान, मूर्तिजा आणि आरीफ या तीन भावांसोबत त्यांचे जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात या तिघांनी अहमदाबाद याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात अहमदाबाद याचा मृत्यू झाला. त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताहीर याला अटक केली. ताहीरच्या दोन भावांचा शोध सुरू असल्याचे देवनार पोलिसांनी म्हटले आहे.