
सामना प्रतिनिधी। बीड
सरकारच्या ऑनलाईन प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला असून बीड बाजार समितीतील गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. विकलेल्या मालाचा मोबदलाही पदरात पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या तूर, उडीद आणि हरभरा या पिकांची खरेदी सरकारच्या हमीभाव योजनेतून केली जात आहे. मात्र, सरकारच्या ऑनलाईन प्रक्रियेचा बीडमध्ये खेळखंडोबा झाला आहे. मर्जीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांना माल खरेदी करून सामान्य शेतकऱ्यां वेठीस धरण्याचे काम बाजार समितीमध्ये केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.

























































