
सामना ऑनलाईन । मुंबई
मान्सून पूर्व सरींनी मुंबईच्या वातावरणात गारवा आणला असला तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मात्र पहिला तडाखा दिला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात असलेल्या रेल्वे स्थानक आणि रुळांवर पाणी साचू लागल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक १५-२० मिनिटे उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रेल्वेची पावसाळ्याची कामे पूर्ण झालेली नाहीत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.























































