
सामना प्रतिनिधी । बंगळुरू
आपल्या एटीएम कम डेबिट कार्डवरून जोडीदार किंवा जवळचे नातेवाईक, मित्राने पैसे काढणे महागात पडू शकते. बंगळुरू येथील वंदना नामक महिलेच्या प्रकरणाने ही बाब अधोरेखित झाली आहे. वंदना यांच्या पतीने त्यांचे कार्ड वापरले. एटीएममधून पैसे निघाले नाहीत परंतु बँकेकडे पैसे निघाल्याची नोंद झाली. बरीच पत्रापत्री, कोर्टकज्जे करावे लागले. अखेरीस एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले, पण कार्ड एकाचे आणि पैसे काढतोय दुसराच हे दिसले आणि नियमावर बोट ठेवून न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.
वंदना यांनी १४ नोक्हेंबर २०१३ रोजी स्टेट बँकेच्या एटीएममधून २५ हजार रुपये काढण्यासाठी पती राजेशकुमार यांना आपले डेबिट कार्ड दिले. पीन नंबरही सांगितला. राजेश यांनी एटीएममध्ये कार्ड स्वाइप केले. तिकडे पत्नीच्या मोबाईलवर २५ हजार काढल्याचा मेसेज गेला, पण इकडे मशीनमधून पैसेच बाहेर आले नाहीत. राजेश यांनी नंतर ही बाब बँकेला कळवली, परंतु डेबिट कार्ड अहस्तांतरणीय असल्याचा नियम दाखवून खातेदार हा एटीएमचा ग्राहक नव्हता आणि त्यांनी पैसे देण्यास नाकारले.
दरम्यान, कंदना यांनी माहितीच्या अधिकाराखाली एटीएमची १६ नोक्हेंबर २०१३ रोजी तपासणी अहकाल मिळवला त्यात यंत्राने २५ हजार रुपयांची रोख रक्कम दाखकिली. तसेच या दांपत्याने एटीएम केंद्रातील सीसीटीक्ही फुटेज मिळकले. तरीही बँकेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर कंदना यांनी न्यायालयात दाद मागितली. साडेतीन कर्षे हा खटला चालला. परंतु एटीएम ज्याच्या नावावर त्यानेच त्याच्या पीनचा वापर करावा. इतरांनी करणे नियमबाहय़ असल्याचा बँकेचा हेका होता. दरम्यान न्यायालयाने गेल्या २९ मे रोजी प्रकरणाचा निकाल दिला त्यात वंदना यांनी पतीला २५ हजारांचा चेक किंवा अधिकृतता पत्र द्यायला पाहिजे होते असे नमूद करून न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.


























































