लातूरमध्ये भिंत कोसळून एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । औशा (लातूर)

शुक्रवारी मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पहिल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूरच्या औसा तालुक्यातील मोगल भागात पावसाने जीर्ण झालेली भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. विश्वनाथ रामा चांदूरे(६८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याशिवाय कन्हेरी, किनीघोट, येळी, भंगेवाडी, खानापूर तांडा याठिाकाणी विजा कोसळून पाच बैलांचा मृत्यू झाला आहे.