‘ताज महल’चे नाव बदलणार? ‘राम महल’ किंवा ‘कृष्ण महल’ ठेवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा जागतिक वारसा आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ‘ताज महल’चे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘ताज महल’चे नाव बदलून ‘राम महल’ किंवा ‘कृष्ण महल’ ठेवा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने केली आहे.

बलिया विधानसभेचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी ‘ताज महल’चे नाव बदलून ‘राम महल’ किंवा ‘कृष्ण महल’ ठेवण्याची मागणी केली आहे. सुरेंद्र सिंह यांच्या या मागणीनंतर नवा वाद सुरू झाला आहे. भाजपकडून जागतीक वारसा असलेल्या वास्तूंबाबत धार्मिक राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केले आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वर्ल्ड टुरिझम दिनाच्या निमित्त राज्यभरातील पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली होती. या यादीमधून ताज महलचे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर योगी सरकारने पर्यंटन योजनेसाठीच्या ३७० कोटींपैकी १५६ कोटी रुपये आग्रा शहर आणि ताज महलचा परिसर सुशोभीत करण्यासाठी वापरण्यात येईल असे म्हणत सारवासारव केली होती.