चाकूर तालुक्यात जोरदार पाऊस, भाटसांगवीचा पुल गेला वाहून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातुर

जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने भाटसांगवी गावाजवळील पुल वाहून गेला आहे. वडवळनागनाथ आणि चाकूर मंडळात अतिवृष्टी झाली. वडवळनागनाथ येथे विद्युत खांब कोसळले.

जिल्ह्यातील वडवळनागनाथ आणि चाकूर मंडळास पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यांनी विद्युत पोल कोसळले. त्यामुळे गाव अंधारात होते. वडवळनागनाथ ते जानवळ रस्त्यावर पाणी साठले होते. हा रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला. भाटसांगवी येथील पुल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला आहे.