
सामना ऑनलाईन, कल्याण
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाच स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं असून धक्कादायक बाब ही आहे की ते मुख्यालयात बसूनच लाच स्वीकारत होते.
७ मजल्यांच्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करू नये म्हणून घरत यांनी ४२ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर घरत यांनी ३५ लाखात सौदा निश्चित केला. यातील ८ लाखांचा पहिला हफ्ता स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलं आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. इतक्या मोठ्या पदावरील अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जबरदस्त खळबळ उडाली आहे.



























































