
भूषण पारळकर । नरसी
हिंदुस्थानी सैन्यात कार्यरत असणारा नांदेडचा जवान विनोद हाणमंतराव वानोळे (वय २६) याचा पठणकोट(पंजाब)मध्ये मृत्यू झाल आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र विनोद वानोळे यांच्या मृत्यूच्या बातमीने गावावर शोककळा पसरली आहे. विनोद यांच्या पाठीमागे आई, वडील, दोन भाऊ आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ते ४० दिवस सुट्टीवर होते. ८ दिवसांपूर्वीच कर्तव्यावर पठाणकोट येथे हजर झाले होते. या घटनेनंतर कँम्पवरील अधिकाऱ्यांकडून विनोद वानोळे यांच्या घरच्या वातावरणाची चौकशी करण्यात आली. काही वाद किंवा तणाव होता का, अशीही विचारणा झाल्याची खात्रीपूर्वक माहिती कळते आहे. तसेच मृत्यूपूर्वी वडील व भावाशी त्यांचे संभाषण झाल्याचेही समजते.
























































