महागाईचे ‘अच्छे दिन’, १४ महिन्यांतील रेकॉर्डब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पेट्रोल, डिझेल दरवाढीने त्रस्त झालेल्या जनतेवर आता आणखी महागाईचा भार पडला आहे. घाऊक बाजारातील महागाईचा दर ४.४३ टक्के झाला असून १४ महिन्यांतील हा उच्चांक आहे. भाजीपाला, फळे, खाद्यवस्तूंचे दर भडकले आहेत. त्यामुळे जनतेच्या खिशावर बोजा पडला आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक मूल्य सूचकांक अर्थात सीपीआयने मे महिन्याचा होलसेल प्राईज इंडेक्स म्हणजे घाऊक मूल्य सूचकांक जारी केला आहे. त्यात घाऊक बाजारातील महागाईचा दर ४.४३ टक्के झाला आहे. १४ महिन्यांतील हा उच्चांकी दर आहे. तीन दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात महागाईचा दर ४.८७ टक्के असल्याचे जाहीर केले होते.

महागाईचा परिणाम अर्थव्यवस्था आणि जनतेवर
– महागाईचा थेट परिणाम जनतेच्या बजेटवर आणि अर्थव्यवस्थेवर होतो.
– वस्तूंची दरवाढ झाल्यास लोकांची खरेदी क्षमता कमी होते. पर्यायाने बाजारात पैसा कमी येतो.
– सरकारच्या तिजोरीवरही परिणाम होतो. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवडय़ात महागाईवर चिंता व्यक्त करीत रेपोरेटचे दर ०.२५ टक्क्याने वाढविले. पर्यायाने गृहकर्जासह इतर कर्ज महाग झाले आहे.

सर्वच महाग
पेट्रोल, डिझेलआणि वीज ७.८५ टक्के तर मे महिन्यात ११.२२ टक्के
भाज्या एप्रिल महिन्यात ०.८९ टक्के मे महिन्यात २.५१ टक्के
खाद्य वस्तू एप्रिल महिन्यात ०.८५ टक्के मे महिन्यात १.६० टक्के
बटाटा एप्रिल महिन्यात ६७.९३ टक्के मे महिन्यात ८९.९३ टक्के

इंधन दरवाढीचा फटका
पेट्रोल, डिझेलच्या प्रचंड दरवाढीचा फटका बसला आहे. मालवाहतूक मागल्यामुळे वस्तूंचे दर भडकले.

महागाईत सातत्याने वाढ
महागाईत या वर्षी सातत्याने वाढ होत आहे. जानेवारीत महागाईचा दर ३.०२ टक्के होता. फेब्रुवारीत २.७४ टक्के, मार्च २.७४ टक्के, एप्रिल ३.१८ टक्के, मे ४.४३ टक्के.