महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पर्रिकर पुन्हा सक्रिय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गोवा

फेब्रूवारी मध्ये तब्बेत बिघडल्याने सुरूवातीला मुंबई आणि ५ मार्चपासून १४ जून पर्यंत अमेरिकेत उपचार घेऊन गोव्यात परतलेल्या मुख्यमंत्री आज माशेल येथील कुलदैवत आणि पणजी येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कामास सुरुवात केली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबीयांसह माशेल येथील मल्लीनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर सकाळी १० वाजता ते पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात पोचले. पर्रिकर दर्शनासाठी येणार असल्याने मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पणजी हा पर्रिकर यांचा मतदारसंघ असल्याने भाजप पदाधिकारी आणि पर्रिकर यांचे चाहते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पर्रिकर मंदिरासमोर कार मधून उतरून पोलिसांच्या गराड्यात मंदिरात गेले. तेथे त्यांनी देवी आणि गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पर्वरी येथील सचिवालयात रवाना झाले.