
सामना प्रतिनिधी।औराद शहाजानी
निलंगा तालुक्याच्या तेरणा नदीपात्रात बुधवारी पुन्हा अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.
बुधवारी तगरखेडा शिवारातील नदीपात्रातील बॅरेजच्या बाजुला एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे स्थानिकांनी बघितले. मतदेहाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बघता बघता हे वृत्त गावात पसरले . त्यानंतर भागवत मनोहर साठे यांनी पोलिसात याबद्दल कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर नदीपात्रातील मृतदेहास बाहेर काढण्यात आला व शवेविच्छेदनासाठी लातूर येथील शवागृहात पाठविण्यात आला.




























































