
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गुरुग्रामामध्ये रस्त्याच्या बाजूला गाडी पार्किंग करण्याच्या वादातून ३४ वर्षीय महिलेन सुनील नावाच्या रिक्षाचालकावर गोळीबार केला आहे.या घटनेतील आरोपी महिला व तिच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुग्रामच्या भवानी एन्क्लेवच्या विभागात एका महिलेनं रिक्षा चालकाला पार्किंच्या वादातून गोळीबार केला आहे. या महिलेनं या रिक्षाचालकाला त्याची रिक्षा रस्त्याच्या कडेला पार्क करण्यास सांगितलं होती. या रिक्षाचालकानं त्याची रिक्षा एका बाजूला पार्कही केली.पण काही कारणास्तव या दोघांत एवढं भांडण झालं की या महिलेनं चक्क त्याच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली.तसंच या महिलेच्या नवऱ्यानं ही त्याला कानाखाली लगावून दिली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोक ही याचा घटनेचा व्हिडीओ तयार करत होते. पोलिसांना या घटनेबाबत सांगितलं असता तेथील सहाय्यक पोलिस आयुक्तांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसंच या घटनेतील तिसऱ्या आरोपीची चौकशी चालू असल्याचं ही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

























































