
सामना प्रतिनिधी । नाशिक
चांदवड तालुक्यातील धोतरखेडे शिवारात शनिवारी सकाळी अचानक टायर फुटल्याने क्रूझर जीप दुभाजक ओलांडून बसवर आदळली. या अपघातात आठजणांचा मृत्यू झाला. मृतांत पाच महिला, दोन मुली व क्रूझर चालकाचा समावेश आहे. सटाणा तालुक्यातील किकवारी येथील १७ जण शनिवारी नाशिक येथे विवाहासाठी क्रूझरने जात होते. शिरवाडे फाटा येथे धोतरखेडे शिवारात क्रूझरचा पुढचा टायर फुटल्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने ती दुभाजक ओलांडून समोरून येणाऱया नाशिक-सटाणा एसटीवर धडकली. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली. मात्र वेगातील क्रूझर बसवर आदळून डांगसौंदाणे येथील रत्ना गांगुर्डे, धनुबाई काकुळते, तेजश्री शिंदे, कृष्णाबाई शिंदे, सरस्वतीबाई जगताप यांच्यासह क्रूझर चालक अशोक गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला.























































