आत्म्यांच्या आदेशानंतर वकिलाची बायकोला गर्भपात करण्यासाठी जबर मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

गरोदर बायकोला मारहाण करणाऱ्या एका वकिलाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. मारहाणीमुळे या महिलेचा गर्भपात झाला असून तिने तिच्या पतीविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तिच्या तक्रारीनुसार तिच्या नवऱ्याला मृतात्म्यांशी बोलण्याची सवय आहे व त्या आत्म्यांच्या सांगण्यावरूनच तो तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करत होता. मात्र तिने गर्भपातास नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करून तिचा गर्भपात घडवून आणला.

सदर महिला ही मूळची दिल्लीची असून ती देखील सत्र न्यायालयात वकील आहे. तिने मुंबईतच कायद्याचे शिक्षण घेतले. काही महिन्यांपूर्वी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका तरुणासोबत तिचा प्रेमविवाह झाला होता. तिच्या पतीला मृतात्म्यांशी बोलायची विचित्र सवय असल्याचे तिला लग्न झाल्यानंतर समजले. सदर महिला गरोदर राहिली त्यानंतर तिचा नवरा मृतात्म्यांशी बोलत असताना त्यातील काहींनी त्याला बायकोचा गर्भपात कर नाहीतर हे बाळ तुझ्या आयुष्यात वाईट गोष्टी घडवेल असे सांगितले. त्यानंतर त्याने बायकोला गर्भपात करण्यास सांगितले. माात्र तिने नकार दिला. त्यानंतरही तो तिला गर्भपात करण्यासाठी सतत धमकावत होता. मात्र ती ऐकत नसल्याने एकदा त्याने तिला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर ती तात्काळ दिल्लीला तिच्या माहेरी निघून गेली. मात्र तिथे गेल्यानंतर तिला रक्तस्त्राव होऊ लागल्याने डॉक्टरांना तिचा गर्भपात करावाा लागला.

सदर महिला आता मुंबईत परतली असून तिने तिच्या नवऱ्याविरोधात कुलााबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखलव केली आहे. ‘याप्रकरणी आम्ही वकिलाला अटक केली असून त्याच्याविरोधात मारहाण करणे, जन्माआधीच गर्भातील बाळाची हत्या करणे असे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती झोन १ चे पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली.