भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । सोलापूर

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना हैदराबाद रोडवर पहाटेच्या सुमारास घडली असून, यात एकजण गंभीर जखमी आहे. सादिक नूरअहमद शेख असे मृताचे नाव असून, साजिद नूरअहमद शेख हा जखमी झाला आहे.

सादिक नूरअहमद शेख व त्याचा भाऊ साजिद नूरअहमद शेख हे दोघे हैदराबाद रस्त्यावरील हॉटेल नवाज येथे असलेला कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घराकडे परतत होते. पहाटे दोनच्या सुमारास क्रॉस रोडवर असलेल्या गतिरोधकाजवळ थांबलेले असताना पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. यात सादिक शेख हा जागीच ठार झाला, तर त्याचा भाऊ साजिद गंभीर जखमी आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली असून, फौजदार भोसले तपास करीत आहेत.