
सामना प्रतिनिधी , पंढरपूर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात मानाचा हिरा या अश्वाचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या आठ वर्षांपासून न चुकता वारी करणारा हिरा पंढरीची वारी अर्ध्यावर सोडून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांचा हिरा हा अश्व गेली आठ वर्षे चालत होता. त्याचे मृत्यूसमयी वय तेरा वर्षांचे होते. त्याने आळंदी ते पुणे या ३० किलोमीटरच्या वाटचालीत माऊलींची सेवा पार पाडली. शनिकारी रात्री माऊलींचा सोहळा पुण्यात दाखल झाला. आज रकिवारी सकाळी ७ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
हिराच्या आकस्मिक निधनामुळे राजा नामक अश्व पुढील टप्प्यात माऊलींच्या सेकेत दाखल होणार आहे.































































