नाणार रद्द होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

नाणार प्रकल्पावरून सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळात रणकंदन झाले. या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला तेथील सर्व गावांचा ठाम विरोध असताना बनावट संमतीपत्राद्वारे सरकारने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे जोपर्यंत नाणार प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका आज शिवसेनेने घेतली. ‘नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे’, ‘कोण म्हणतो जाणार नाही, नाणार रिफायनरी होऊ देणार नाही’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. शिवसेनेच्या या भूमिकेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचीही साथ मिळाली. या गोंधळातच सलग दुसऱया दिवशी विधानसभेचे कामकाज गुंडाळण्यात आले, तर नाणारचा विषय विधान परिषदेतही पेटल्याने तिथलेही कामकाज ठप्प झाले.

नाणार प्रकल्पाला लोकांचा प्रचंड किरोध असून सरकार बनाकट संमतीपत्रांच्या आधारे भूसंपादन करते आहे. हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी नाणारचे नागरिक थेट नागपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे सभागृहाचे उर्करित कामकाज स्थगित करून नाणार प्रकल्पाबाबत चर्चा घ्याकी आणि हा प्रकल्प रद्द कराका अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. यावेळी बनावट कागदपत्रांद्वारे भूसंपादन झाले आहे ती सर्व कागदपत्रे शिवसेनेकडे आहेत असे सांगत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सभागृहात चर्चेची मागणी केली, मात्र स्थगन प्रस्ताव फेटाळताच आमदार सुनील प्रभू, वैभव नाईक, अजय चौधरी, सुनील राऊत, सुनील शिंदे, प्रताप सरनाईक, मंगेश कुडाळकर, प्रकाश फातर्पेकर, चंद्रदीप नरके, सुभाष साबणे यांच्यासह सर्वच शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणा दिल्या. या गोंधळातच चार विधेयके मंजूर करीत सभागृहाचे कामकाज गुंडाळण्यात आले.

शिवसेनेने नाणार प्रकल्पाला सर्वप्रथम विरोध केला
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व आरोप खोडून काढत राजकीय हेतूने शिवसेनेचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला. सर्वप्रथम शिवसेनेने या प्रकल्पाला विरोधक केला असून नाणारवासीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे सभागृहाची दिशाभूल करू नये. नागपूरमध्ये आंदोलनासाठी आलेल्या नाणारवासीयांची शिवसेना आमदारांनी भेट घेतली. तेथील जनतेचा प्रश्न मांडण्यासाठी काल सर्वात पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मांडू दिला गेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाविषयी भेटण्यास येणाऱया केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट नाकारली. स्वतः नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी समितीचे अशोक वालम यांनी शिवसेनेमुळेच हा प्रकल्प नाणारमधून हद्दपार होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेविरोधात बोलू नका असे सांगत सुनील प्रभू यांनी प्रकल्पग्रस्तांचे निवेदन पटलावर ठेवत चर्चेची मागणी केली, मात्र अध्यक्षांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारल्याने शिवसेना आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी नाणार प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

२० वर्षांपासून गायब असलेल्या मारुती मांजरेकरच्या नावाने भूसंपादन
नागरिकांची संमतीपत्रे घेतल्याचा दावा सरकार करते आहे, परंतु हा दावाा साफ खोटा आहे. मूळ कोकणवासी नसलेल्या बाहेरील काही नागरिकांनी या गावांमध्ये जमिनी खरेदी करून त्यांची संमतीपत्रे घेण्यात आली आहेत. गोठीवरे येथील मारुती सीताराम मांजरेकर नामक व्यक्ती पोलीस रेकॉर्डनुसार मागील २० वर्षांपासून बेपत्ता आहे, परंतु बेपत्ता असलेल्या मांजरेकर यांचे बनावट आधारकार्ड तयार करून त्यांचे कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आले व त्या आधारे नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. यासंदर्भात अॅड. अश्विनी आगाशे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती त्यांनी सभागृहासमोर ठेवली. नाणार प्रकल्पाच्या शेजारीच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्याचे हवाई अंतर हे फक्त १.२ कि. मी. आहे. हे दोन्ही प्रकल्प जवळजवळ असणे धोक्याचे असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी म्हटले. या ठिकाणी काही अपघात घडला तर हाहाकार उडेल. त्यामुळे हा प्रकल्प आमदार आशीष देशमुख यांनी सुचविल्याप्रमाणे विदर्भात न्या आणि जमले तर प्रकल्पासोबत समुद्रही घेऊन जा असा सल्ला भास्कर जाधव यांनी दिला.

विधान परिषद कामकाज तहकूब
नाणार रिफायनरी प्रकल्पावर २८९ च्या स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करण्याची मागणी सभापती रामराजे निंबाळकर यांनी फेटाळून लावल्याने या विरोधात शिवकसेनेने आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्थगन प्रस्तावाची जोरदार मागणी करीत नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णयात्मक घोषणा करावी. या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. आमदार सुनील तटकरे यांनी नाणारविरोधात कोकणातील जनता नागपूरमध्ये आली आहे. तेव्हा सर्व कामकाज थांबवून नाणार प्रकल्पाबाबत चर्चा घ्या. यावेळी शिवसेनेच्या विधान परिषदेतील सर्व आमदारांनी जोरदार घोषणा दिल्या. यानंतर १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू झाल्यानंतर सभापतींनी लक्षवेधी पुकारली. तरीही नाणारवरून आक्रमक झालेल्या आमदारांमुळे काम करणे शक्य नसल्याने दिवसभरासाठी विधान परिषद तहकूब केली. यामुळे कामकाज चालवणे शक्य नसल्याने सभापतींनी विधान परिषदेचे कामकाज तहकूब केले.

सिंधुदुर्ग जिह्यातील राजापूर तालुक्यातील बारा गावांतील मूळ मालकांचे खोटे प्रमाणपत्र तयार करून अधिकाऱयांच्या माध्यमातून जमिनी बळकावण्याचे काम सरकार करीत आहे. याचा शिवसेनेने निषेध केला आहे. या प्रश्नावर विधानसभेत चर्चा व्हावी ही आमची मागणी आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा सुनील प्रभू यांनी नंतर सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना दिला.

विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशी तिन्ही पक्षांची मागणी आहे. केंद्र सरकारने राज्य व राज्य सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीही संमती न घेता हा प्रकल्प लादला आहे. नाणारबाबत सभागृहात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत सापडले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या प्रकल्पाला शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही विरोध दर्शविला होता. या प्रकल्पात सौदी अरेबियातील कामगार, पाकिस्तानचे अभियंते येऊन काम करणार आहेत का, याबाबत सरकारने स्पष्ट करावे असे आवाहन त्यांनी केले.

– बारा गावांतील जमीनधारकांची बनावट कागदपत्रे विधानसभेत सादर करण्यात आली आहेत. तेव्हा अशा प्रकारे भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, अजय चौधरी, वैभक नाईक, बालाजी किणीकर आदी उपस्थित होते.

– विधानसभेत फडणवीस सरकार अल्पमतात आले असून नाणार प्रकल्पाकरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत. आता तरी सरकारने नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली.