माधुरीला खासदारकी मिळण्याच्या अफवा थंडावल्या, चौघांची खासदार म्हणून नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या खासदारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये संघविचारक राकेश सिन्हा यांचाही समावेश आहे. सिन्हा यांच्याशिवाय शेतकरी नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ महापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांचाही समावेश आहे. अभिनेत्री रेखा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि के.पारासन यांचा कार्यकाळ संपल्याने  या जागा रिक्त झाल्या होत्या.

या चार जागांसाठी क्रिकेटपटू कपिल देव, अभिनेत्री माधुरी दिक्षित आणि महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे वंशज चंद्र कुमार बोस यांच्या नावाची चर्चा होती.