
सामना प्रतिनिधी । हिंगोली
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोलीचे युवासेना जिल्हा युवा अधिकारी बाजीराव सवंडकर यांनी २४ जुलै रोजी आखाडा बाळापूर येथे कुसुमताई चव्हाण सभागृहात भव्य रक्तदान शिबीर तसेच मोफत ह्रदयरोग व मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीराचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच रक्तदानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बाजीराव सवंडकर यांनी केले आहे.
या शिबीरप्रसंगी उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमतचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा तर उद्घाटक म्हणुन हिंगोली लोकसभा संघटक डॉ. बी. डी. चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यासोबतच शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, नांदेडचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, आमदार हेमंत पाटील, डॉ. राहुल पाटील, विप्लव बाजोरीया, नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, जि.प. अध्यक्षा शिवराणी प्रकाश नरवाडे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नांदेड येथील ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्त संकलन केले जाणार असुन तज्ञ डॉक्टरांमार्फत ह्रदयरोग मधुमेह तसेच स्त्री रोग तज्ज्ञामार्फत उपचार व निदान करण्यात येणार आहे. २४ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आखाडा बाळापुरच्या कुसूमताई चव्हाण सभागृहात होणाऱ्या या शिबीरासाठी डॉ. बोंढारे हॉस्पिटल आणि मोहन मेडिकल आखाडा बाळापूर येथे नाव नोंदणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी बाजीराव सवंडकर यांनी केले आहे.




























































