
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर प्रवेश यापुढे ऑनलाइन होणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळापत्रकापासून गुणपत्रिकेपर्यंतची सर्व माहिती मोबाईल ऍपवर पाहता येणार आहे. यासाठी विद्यापीठाने एक अत्याधुनिक अॅप विकसित केले आहे. पीएचडी प्रवेश परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी ही घोषणा केली.
विद्यापीठाच्या निकालांची सद्यस्थिती आणि विद्यापीठाच्या नवीन संकल्पनांबाबत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. परीक्षांबाबतही संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच मिळणार असल्याचे ते म्हणाले. यामध्ये विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यास त्याचा पेपर त्याला ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत आणखी पारदर्शकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळी सत्र परीक्षांचे सर्क निकाल परीक्षा झाल्यानंतर ४५ दिकसांच्या आत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. याकेळी नकनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि प्रभारी कुलसचिक डॉ. दिनेश कांबळे, परीक्षा संचालक अर्जुन घाटुळे, जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे उपस्थित होते.
परीक्षा उशिरा संपल्याने काही निकाल लटकले
विद्यापीठाच्या ४९० परीक्षांपैकी १५१ निकाल जाहीर करण्यात आले असून अद्याप ३३९ निकाल जाहीर झालेले नाहीत. यामध्ये सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी विभागातील १५१ निकालांचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांमधून एकूण १६ लाख ६२ हजार ७६७ उत्तरपत्रिका तपासणीसाठी उपलब्ध असून त्यापैकी १४ लाख ७६ हजार ३७९ उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या आहेत. १ लाख ८६ हजार ३८८ उत्तरपत्रिका तपासणे बाकी असल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी जाहीर केले. सध्या काही परीक्षा सुरू असल्याने या एक लाख उत्तरपत्रिकांमध्ये आणखीन दोन ते तीन हजार उत्तरपत्रिका वाढणार आहेत. सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेला वाणिज्य आणि विधी विभागाच्या काही परीक्षा उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे यातील काही परीक्षांचे निकाल जाहीर करता आलेले नाही.
प्राध्यापक घरबसल्या पेपर तपासणार
विधी विभागात प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे पेपर तपासणीवर परिणाम होतो. प्रॅक्टिस करणाऱया प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी बोलवावे लागते. या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांना त्यांना सोयीच्या ठरणाऱया जागेवरून लॅपटॉप, कॉम्प्युटरवरून पेपर तपासणी करण्याची सोय देण्याबाबत विचार सुरू असल्याचे यावेळी कुलगुरू पेडणेकर यांनी सांगितले.
येत्या वर्षांपासून नवीन उत्तरपत्रिका
‘बबलिंग’च्या समस्येवर तोडगा काढताना विद्यापीठाने आगामी परीक्षेसाठी नवीन उत्तरपत्रिका छापल्या असून या उत्तरपत्रिका कापरात आणल्या जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांची सर्व माहिती छापूनच येणार असून त्यात त्यांचे बैठक क्रमांक, कॉलेज कोड, विषयाचे कोड यासारख्या आवश्यक त्या सर्व माहितीचा समावेश असेल.
गेल्या वर्षी ऑनलाइन मूल्यांकनात झालेला गोंधळ टाळण्यासाठी या वर्षी तंत्रज्ञानात अत्याधुनिक बदल केल्याने निकाल ३५ ते ४५ दिवसांच्या आधीच जाहीर करणे शक्य झाले आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक बदल करण्यात येतील. परीक्षांबाबत पत्रकार परिषद घेण्याची वेळ येणार नाही.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू





























































